नागपूर – भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीसाठी सकल मराठा समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. नागपूरचा मागील पाच वर्षात झालेल्या विकासामुळे सकल मराठा समाजाने नितीन गडकरींना पाठिंबा देण्याचे ठरवले असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
समाजातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नितीन गडकरी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे, सकल मराठा समाजाचे प्रशांत मोहिते आणि नरेंद्र मोहिते यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. नितीन गडकरी नागपूर मधून आगामी लोकसभा निवडणूक लढवत असून, त्यांच्यासमोर काँग्रेस पक्षाचे नाना पटोले यांचे आव्हान असणार आहे.