राहुरीतील कृषी विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरींना भोवळ

अहमदनगर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी अहमदनगरमधील राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमादरम्यान भोवळ आली. गडकरी हे राहुरी कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सभारंभासाठी राहुरीत आले होते. यावेळी व्यासपीठावर असतानाच गडकरी यांना अचानक चक्कर आली. नितीन गडकरी यांचे भाषण सुरू झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना हा प्रकार घडला.

यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी नितीन गडकरींना सावरलं. या घटनेमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. .यानंतर गडकरी यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनतर गडकरी यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली. शुगर कमी-जास्त झाल्याने त्यांना चक्कर आल्याची शक्यता वर्तवली आहे.

-Ads-

नितीन गडकरींच्या नियोजित कार्यक्रमांमधील हा शेवटचा कार्यक्रम होता. त्यानंतर ते शिर्डिला साईबाबांच्या दर्शनाला जाणार होते. परंतु चक्कर आल्याने त्यांना विशेष विमानातून नागरपूरला रवाना करण्यात आलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)