निस्सान कंपनीकडूनही दरवाढ जाहीर

मुंबई – वाहन उत्पादक कंपनी निस्सानने शुक्रवारी आपल्या काही उत्पादनांच्या दरात चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

डॅटसन गो आणि गो प्लस या मॉडेलच्या दरांमध्ये वाढ केली असल्याचे कंपनीचे संचालक हार्दिक सिंग ब्रार यांनी सांगितले. कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असल्यामुळे आम्हाला ही दरवाढ करावी लागत आहे, असे त्यांनी सांगितले. गुरुवारी महिंद्रा कंपनीने आपल्या उत्पादनांच्या दरात 73 हजार रुपयांपर्यंत वाढ केली होती, तर त्याअगोदर रेनॉ या कंपनीने तिच्या उत्पादनांच्या दरातील टक्‍क्‍यापर्यंत वाढ केली होती. टाटा मोटर्स या कंपनीनेही अगोदरच दरवाढ जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)