नीरव मोदीची 177 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त 

नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेला तब्बल 13 हजार कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या नीरव मोदीच्या 177 कोटींच्या संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्ती आणली आहे. पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. निरव मोदीच्या मुंबई आणि सुरतमधील संपत्तीवर ईडीकडून जप्ती आणण्यात आली आहे. यामध्ये आठ आलिशान गाड्या, मशिनरी, प्लांट, दागिने, पेंटिग्ज आणि स्थावर मालमत्तेचा समावेश असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

यावेळी मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने निरव मोदींचं खासगी आर्ट कलेक्‍शनही जप्त केले असून यामध्ये प्रसिद्ध चित्रकारांच्या पेंटिग्जचा समावेश आहे. अमृता शेरगिल, एम एफ हुसेन यांच्या पेंटिग्जचा यामध्ये समावेश असून त्यांची किंमत 50 कोटींच्या घरात आहे. गतवर्षी आयकर विभागाने सर्च ऑपरेशन दरम्यान एकूण 173 पेंटिग्ज आणि आर्टवर्क जप्त केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या 13,500 कोटींच्या घोटाळ्यामागे नीरव मोदी असल्याचे समोर आल्यानंतर ईडीने नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांच्याविरोधात 24 आणि 26 मे रोजी आरोपपत्र दाखल केले होते. तसेच इंटरपोलनेदेखील या दोघांविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. याप्रकरणात आत्तापर्यंत ईडीने भारत आणि परदेशात मिळून 4,800 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली असल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)