नीरव मोदीला जमावाकडून ठार मारले जाण्याची वाटतेय भीती… 

म्हणून भारतात परतणार नाही ; वकिलाने दिली माहिती 

मुंबई: भारतातील बॅंकांना हजारो कोटी रूपयांचा चूना लावुन विदेशात फरारी झालेला नीरव मोदी हा भारतात परत येणार नसल्याची माहिती त्याच्या वकिलाने दिली आहे. आपण भारतात परत आलो तर लोकांकडून आपल्यावर हल्ला होऊन आपल्याला ठार मारले जाण्याची भीती आहे असे कारण त्यांनी दिले आहे असेही त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. विशेष न्यायालातील आज झालेल्या सुनावणीच्यावेळी नीरवचे वकिल विजय आगरवाल यांनी ही माहिती दिली. ईडीने आज विशेष न्यायालयात अर्ज करून नीरव मोदीला फरारी घोषित करण्याची मागणी केली त्यावेळी झालेल्या सुनावणीच्यावेळी त्यांच्या वकिलांनी ही माहिती दिली.

-Ads-

नीरव मोदीच्या वकिलांनी त्याच्या सुरक्षेचा जो मुद्दा उपस्थित केला आहे तो निरर्थक आहे असे इडीच्यावतीने सांगण्यात आले. त्यांनी सांगितले की त्याने तपास कामाला अजिबात सहकार्य केले नाही. त्याला अनेक इमेल्स व समन्स जारी करण्यात आली आहेत पण त्याने कशालाही धूप घातलेली नाही. त्याची स्वत:चीच भारतात परत येण्याची इच्छा नाही असेही ईडीच्यावतीने आजच्या सुनावणीच्यावेळी सांगण्यात आले.त्यांचा दावा खोडून काढताना नीरवचे वकील आगरवाल म्हणाले की आमच्या अशिलाने ईडीच्या प्रत्येक ईमेलला उत्तर दिले आहे.

केवळ सुरक्षेच्या कारणास्तव नीरव मोदी भारतात येऊ इच्छित नाही असे त्यांनी नमूद केले. ईडी आणि सीबीआयला पाठवलेल्या पत्रात नीरवने म्हटले आहे की भारतात माझी पंन्नास फुटी प्रतिमा जाळण्यात आली आहे, माझी तेथे रावण अशी प्रतिमा रंगवण्यात आली आहे त्यामुळे जमावाकडून माझी हत्या होण्याची शक्‍यता असल्याने इच्छा असूनही मला भारतात येणे अवघड झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)