निर्मला सीतारामन यांच्या अमेरिका दौऱ्यात एफ 16, सशस्त्र ड्रोन बाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही

वॉशिंग्टन: भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण विषयक सहकार्याला अधिक चालना देण्याच्या उद्देशातून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आयोंजित केलेल्या पाच दिवसांच्या अमेरिका दौऱ्याची आज सांगता झाली. तथापी त्यांच्या या दौऱ्यात एफ 16 विमाने आणि सशस्त्र ड्रोन विषयी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. एफ 16 विमाने भारतात तयार करण्याचा प्रस्ताव भारताने अमेरिकेला दिला आहे त्या विषयी निर्मला सीतारामन यांच्या दौऱ्यात काही निर्णय होईल अशी अपेक्षा होती. भारत सरकारने मेक ईन इंडियाचा जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्यात अमेरिकन कंपन्यांचे योगदान वाढावे यासाठी सीतारामन यांनी या दौऱ्यात प्रयत्न केला.

अमेरिकन संरक्षण मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की दोन्ही देशाच्या संरक्षण दलांच्या हिताच्यादृष्टीने काही बाबतीत अधिक विधायकपणे आणि अधिक वेगाने उपाययोजना करण्याची गरज आहे त्यादृष्टीने आम्ही काही निर्णय घेतले आहेत. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री असलेल्या सीतारामन यांना अमेरिकेने त्यांच्या पहिल्याच दौऱ्यात रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली. अमेरिकेच्या महत्वाच्या संरक्षण ठिकाणांची त्यांना सफर घडवण्यात आली आणि त्यांना त्याची माहिती देण्यात आली. असा सन्मान अन्य लोकांना क्वचितच मिळतो.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)