नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुस-या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प आज, शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन सकाळी 11 वाजता लोकसभेत हा अर्थसंकल्प सादर केला. यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान 1970-71 मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे गेला असला, तरी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. कारण इंदिरा गांधी पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. 1970-71मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खाते स्वतःकडे ठेवले होते. मात्र सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.
यापूर्वीही त्यांनी पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान, तब्बल 49 वर्षानंतर महिला अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी 1970 मध्ये पंतप्रधन आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प सादर केला होता.