निर्मला सीतारामन यांची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांशी चर्चा

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही देशांनी परस्परांमधील संरक्षण तसेच सुरक्षा क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत हा इंडो-पॅसिफीक तसेच संपुर्ण जगासाठी स्थीरता निर्माण करणारा देश आहे असे मॅटिस यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण मंत्री पातळीवरील ही चौथी फेरी होती. येथील चर्चेनंतर सीतारामन या अमेरिकेच्या हवाई येथील डिफेन्स इनोव्हेशन युनिटला भेट देणार आहेत.

या दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातील लष्करी संबंध हे केवळ पोकळ शब्दांवर अवलंबून नाहीत. दोन्ही देशांनी एकमेकांची ताकद ओळखून मानवी हितासाठी एकमेकांना सहकार्य करीत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शांतता, मैत्री आणि स्वातंत्र्य या मुल्यावर भारत आणि अमेरिका यांची ही मैत्री टिकून राहील असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्यातील ही भागीदारी ही नैसर्गिक भागीदारी असून ही जगातल्या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील भागीदारी आहे असे मॅटिस यांनी यावेळी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)