निरंकारी भवनावरील हल्ल्याचे प्रकरण माहिती देणाऱ्याला 50 लाखांचे बक्षिस

चंदीगड – अमृतसर मधील निरंकारी भवनावर काल झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण ठार तर 20 जण जखमी झाले होते या हल्ल्याचे कोणतेही धागेदोरे अद्याप हाती आलेले नाहीत. या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला राज्य सरकारने 50 लाखांचे बक्षिस दिले आहे. हा दहशतवादी हल्ला असावा आणि त्यात खलिस्तानी अतिरेक्‍यांचा हात असावा असा प्राथमिक कयास आहे. पोलिसांनी अनेक तपास पथके या कामी लावली आहेत.

ज्या निरंकारी भवनावर हा हल्ला झाला आहे ते ठिकाण भारत-पाक सीमा रेषेजवळच आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळही येथून जवळच असल्याने हा विषय अधिक िंचंताजनक ठरला आहे. निरंकारी भवन हे संत निरंकारी मिशनचे धार्मिक ठिकाण आहे. येथे सत्संगाचा कार्यक्रम सुरू असताना हा हल्ला झाला आहे. या हल्ल्या मागचा हेतू अजून समजू शकलेला नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)