तिरुवनंतपूरम – केरळमध्ये पुन्हा एकदा निपाह व्हायरसने डोके वर काढले आहे. केरळ राज्याच्या आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी एक रुग्ण आढळल्याची माहिती दिली आहे. एर्नाकुलममध्ये वास्तव्यास असणारा २३ वर्षीय तरुण पुणे व्हायरोलॉजी टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे.
राज्यातील ८६ संशयित रुग्ण डॉक्टरांच्या निगराणीत आहेत. त्यांच्यामध्ये अद्याप निपाह व्हायरसची पुष्टी झालेली नाही. एर्नाकुलम मेडिकल कॉलेजमध्ये निपाह व्हायरसच्या रुग्णांसाठी स्पेशल वॉर्ड बनविण्यात आला आहे. आरोग्य मंत्री केके शैलजा यांनी म्हंटले कि, भीती वाटण्याचे कोणतेही कारण नाही. आरोग्य विभाग कोणतीही परिस्थिती सांभाळण्यास तयार असून आमच्याकडे पुरेसा औषध साठा उपलब्ध आहे. सोबतच आरोग्य मंत्र्यांनी निपाह व्हायरसबद्दल कोणतेही अफवा न पसरवण्याची विनंती केली आहे.
Kerala Health Minister KK Shailaja confirms a positive case of Nipah virus. One person from Kochi's Ernakulam was tested positive in the results that came from Pune Virology Institute. https://t.co/6NC28mT5CJ
— ANI (@ANI) June 4, 2019
दरम्यान, २०१८ साली केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे १८ जणांचा मृत्यू झाला होता. तर ७५० पेक्षा अधिक रुग्णांना निगराणीत ठेवण्यात आले होते.