इसिसशी संबंधीत नऊ जणांना ठाणे आणि औरंगाबादेत अटक

मुंबई: महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या आरोपावरून एकूण नऊ जणांना ठाणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातून अटक केली आहे. त्यात एका सतरा वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. त्यांच्याकडून साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

या संशयितांच्या संबंधात दहशतवाद विरोधी पथकाला आधीच माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यावर पाळत ठेऊन त्यांची माहिती मिळवल्यानंतर दोन दिवसांत ही धरपकड करण्यात आली. ठाण्याच्या मुंब्रा भागात आणि औरंगाबादच्या कैसर कॉलनी, राहत कॉलनी, दमडी महाल या भागात छापे टाकून ही कारवाई करण्यात आली. त्यांच्यावर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून काही शस्त्रे आणि अन्य आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना न्यायालयात हजर केले असता 5 फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंब्रा परिसरात सागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद मजहर शेख या तरुणाच्या घरात सोमवारी मध्यरात्री तीन वाजता ठाणे एटीएसने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर एटीएसने मोहसीन खान आणि फहाद शाह या दोघांनाही ताब्यात घेतले. हे तिन्ही तरुण उच्चशिक्षित आहेत.

हे तिघेही बंगळुरुमधील असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या औरंगाबाद येथील शाखेच्या संपर्कात होते. सलमान नावाचा तरुण औरंगाबादमधील शाखा चालवत होता. तिघे संबंधित संस्थेत जाऊन शिक्षण घेत असल्याचा संशय एटीएसला होता.

या प्रकरणात मझहर शेखच्या घरातील एकूण सहा मोबाईल जप्त केले आहेत. इतर दोन मोबाईल आई आणि भावाचे ताब्यात घेतले असून दोन सिम कार्ड आणि एक लॅपटॉपही ताब्यात घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)