तब्बल नऊ कोटी ग्राहकांनी निवडल्या पसंतीच्या वाहिन्या

नवी दिल्ली – 17 कोटींपैकी 6.5 कोटी केबल टीव्ही आणि डीटीएच ग्राहकांनी स्वतःच्या पसंतीच्या वाहिन्या निवडून नव्या शुल्क व्यवस्थेत प्रवेश केल्याची माहिती दूरसंचार नियामक ट्रायने दिली आहे. उर्वरित ग्राहक लवकरच पसंतीच्या वाहिन्या निवडतील अशी अपेक्षा आहे. पसंतीच्या वाहिन्यांची निवड केलेल्या 9 कोटी ग्राहकांमध्ये 6.5 कोटी केबल टीव्ही ग्राहक आणि 2.5 कोटी डीटीएच ग्राहक असल्याची माहिती ट्रायचे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी दिली आहे.

एकूण 17 कोटी टीव्ही वाहिन्या ग्राहकांपैकी 9 कोटी जणांनी ऑपरेटराजवळ पसंतीच्या वाहिन्यांसाठी नोंदणी केली आहे. एकूण 17 कोटी ग्राहकांपैकी 10 कोटी केबल टीव्ही ग्राहक आहेत. डीटीएच प्री-प्रेड प्रारुप असल्याने ग्राहकांचा दीर्घ तसेच लहान कालावधीचे पॅक समाप्त झाल्यावर ते वाहिन्यांची निवड करणार असल्याचे शर्मा म्हणाले.

गरज भासल्यास ऑपरेटर्सना मदत करत असून योग्य मार्ग दाखवत आहोत. अडचणींची माहिती घेण्यासाठी नियमित बैठक घेत आहोत. ग्राहकांकरता जागरुकता मोहीम राबविण्याची योजना आहे. जागरुकता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यम, मुद्रित माध्यमे, अन्य कार्यक्रमांद्वारे मोहीम राबविली जाणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)