भारतीय लेखिकेला मानाचा नाईन डॉटस पुरस्कार

लंडन – भारतीय लेखिक ऍनी झैदी यांना 2019 सालासाठीचा तब्बल 1 लाख डॉलरचा “नाईन डॉट्‌स’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जगभरातील सद्यस्थितीच्या विषयांवरच्या नाविन्यपूर्ण विचार मांडणाऱ्या लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. मूळच्या मुंबईतील रहिवासी असलेल्या झैदी या मुक्‍तलेखिका आहेत. त्यांनी आतापर्यंत अहवाल, निबंध, लघुकथा, कविता आणि नाटकांचे लेखन केले आहे. त्यांच्या “ब्रेड, सिमेंट, कॅक्‍टस’ या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकातून झैदी यांनी घर आणि भारतातील समकालीन जीवनाबद्दलच्या बांधिलकीच्या अनुभवांचे वास्तव मांडले आहे.

“नाईन डॉटस’ या पारितोषिकासाठी कोणत्याही सीमांचे बंधन पाळले जात नाही. याचा अपल्याला विशेष आनंद असल्याचे झैदी यांनी सांगितले. आपले लेखन सातत्याने प्रवासाशी संबंधित आणि पत्रकारितेच्या कामाशी संबंधित असल्याचे झैदी यांनी सांगितले. त्यांच्या पुस्तकामध्ये “होम’ या 3 हजार शब्दांच्य निबंधामध्ये “घरासारखे काही ठिकाण नाही का ?’ असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)