पुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कदम वाक वस्ती ग्रामपंचायती समोर एर्टिगा आणि ट्रकमध्ये मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत. ह्यातील सर्व जण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि आज घरी सर्व येत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या एर्टिगा या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलंडुन ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कारमधील सर्व मयत विद्यार्थी शुक्रवारी सकाळी रायगडला फिरायला गेले होते. संध्याकाळी परत येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत घिगे, दत्ता गणेश यादव, व जुबेर अजिज अशी 9 सर्व मृतांची नावे आहेत. सर्व मयत यवत येथील रहिवासी आहेत. या घटनेमुळे तब्बल दोन किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)