शिवसेनेनं नामर्दपणा दाखवून दिला ; निलेश राणेंची टीका !

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे महासभा घेतली. दरम्यान त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ‘गावागावातील शिवसेनेच्या शाखा, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आधाराचे केंद्र बनेल’, अशी घोषणाही त्यांनी केली.

भाजप शिवसेना युतीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  ‘युती होणार का या फालतू चर्चेत मी जात नाही, युतीच आता जनताच ठरवणार’ यावर निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.

निलेश राणे म्हणाले, पंढरपूरच्या सभेत शिवसेना सत्तेचा भागीदार पक्ष म्हणून एक तरी प्रश्नाचे उत्तर शेतकऱ्यांना अपेक्षित होते. तसं झालं नाही फक्त पोकळ भाषण आणि त्याहून कहर म्हणजे युती करायची की नाही ही जनता ठरवेल असं सांगून नामर्दपणा दाखवून दिला. नंतर सांगून मोकळे होतील जनता म्हणाली म्हणून युती केली.

पंढरपूरच्या सभेत अजून एक विनोद म्हणजे, शिवसेनेचे शाखा आता शेतकऱ्यांचे आवाज केंद्र शेतकऱ्यांनो संधी चांगली आहे. उद्यापासून कामाला लागा आणि शाखेत जाऊन कानाखाली आवाज काढायला सुरुवात करा, असे राणे म्हणाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
13 :thumbsup:
1 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)