बांद्यात होलसेल मच्छी मार्केट उभारणार – नितेश राणे 

सिंधुदुर्ग – गोवा सरकारची मासळी विक्रीसाठी इन्सुलेटेड वाहनाची सक्ती आणि इतर अटींमुळे सिंधुदुर्गातील मच्छिमार बांधवांवर ऐन दिवाळीत आभाळ कोसळले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर बांदा येथे होलसेल मच्छी मार्केट उभारले जाणार आहे.

या मार्केटसाठी माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती प्रमोद कामत यांनी जागा उपलब्ध केली असून रविवार दि. 11 रोजी नितेश राणे यांनी मच्छिमार बांधवांसह या जागेची पाहणी केली. मासेमारी हा सिंधुदुर्गातील प्रमुख व्यवसाय आहे. हजारो लोकांची उपजीविका या व्यवसायावर चालते. जिल्ह्यात मिळणारे मासे मोठ्या प्रमाणावर गोव्यात पाठवले जातात. मात्र काही दिवसांपूर्वी फार्मेलिन वापरण्यात येणाऱ्या मासळीवर गोवा सरकारने बंदी घातली आहे. तसेच मासळीची ने-आण करण्यासाठी इन्सुलेटेड वाहनांची सक्ती केली आहे. यामुळे जिल्ह्यातील हजारो मच्छिमार बांधव हवालदिल झाले होते.

हे प्रस्तावित मासळी मार्केट गोव्यातील मत्स्यप्रेमी आणि सिंधुदुर्गातील मच्छीमार बांधव यांच्या सोयीचे ठरणार आहे. यावेळी स्वाभिमानचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मनीष दळवी, बांदा शहराध्यक्ष जावेद खतीब, बांदा उपसरपंच अक्रम खान, डेगवे उपसरपंच मधु देसाई, ज्ञानेश्वर सावंत, दीपक सावंत, साई धारगळकर, सागर सावंत आदी कार्यकर्त्यांसह देवगड आणि वेंगुर्ले येथील मच्छीमार होते उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)