देवीभोयऱ्याच्या नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी वाळुंज

निघोज – पारनेर तालुक्‍यातील देवीभोयरे नवरात्रोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. येथील अंबिका मातेच्या नवरात्रोत्सवाची बैठक नुकतीच पार पडली. मंडळाच्या अध्यक्षपदी संपतराव वाळुंज, कार्याध्यक्षपदी बाबूशेठ बेलोटे, उपाध्यक्ष म्हणून शरद बोरुडे व जितेश सरडे यांची निवड करण्यात आली.

गेल्या 41 वर्षापासून येथे नवरात्रोत्सवात राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा घेतली जाते. याही वर्षी ती होणार आहे. संपूर्ण राज्यातील दर्जेदार व्यावसायिक नाट्य प्रयोग या ठिकाणी होतात. नवरात्रोत्सवानिमित्त दहा ते 18 ऑक्‍टोबर या दरम्यान राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा होतील, अशी माहिती ज्येष्ठ नेते शिवाजीराव जाधव यांनी दिली. या स्पर्धेसाठी प्रथम 41 हजार, 31 हजार 21 हजार व 11 हजार अशी पहिल्या चार क्रमाकांची पारितोषिके आहेत.

-Ads-

इच्छुक नाट्य मंडळांनी संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच सुजाता गाजरे व उपसरपंच विकास सावंत यांनी केले आहे. नवरात्रोत्सवासाठी सर्व ग्रामस्थांनी मिळून प्रातिनिधिक स्वरूपात एक समिती स्थापन केली आहे. या प्रसंगी विश्वनाथ गाजरे, अशोक मुळे, सुभाष बेलोटे, विठ्ठल सरडे, भाऊसाहेब बेलोटे, जगन्नाथ बेलोटे, दीपक मुळे, भाऊसाहेब सरडे, दत्ता मुळे, नरेंद्र बेलोटे, दिनेश गायकवाड, कैलास बेलोटे, रवींद्र गाजरे, धीरज भंडारी, सुलतान शेख आदी मान्यवर उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)