साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला एनआयए कोर्टाचा दिलासा

संग्रहित छायाचित्र....

मुंबई – साध्वी प्रज्ञासिंग यांना निवडणूक लढण्याची परवानगी नाकरण्याची मागणी करणारी याचिका एनआयए कोर्टानं फेटाळली आहे.

दरम्यान, साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळ मधून लोकसभा निवडणूक लढवण्यास मनाई करावी आणि त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका मालेगाव बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या एका व्यक्तीच्या पित्याने एनआयए कोर्टात दाखल केली होती.

पण ही याचिका एनआयए न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयानं न्यायायल देशातील कोणत्याही नागरिकाला निवडणूक लढण्यापासून रोखू शकत नाही असं म्हटलं आहे. तसेच, आरोपीला शिक्षा देखील झालेली नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळं आता साध्वी प्रज्ञासिंह यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

https://twitter.com/ANI/status/1120960900113076224

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)