हरित लवादाकडून पंजाब सरकारला 50 कोटींचा दंड

चंदीगढ – राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) व्यास आणि सतलज नद्यांच्या पात्रात अस्वच्छता फैलावण्याच्या मुद्यावरून पंजाब सरकारला 50 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. लवादाने राज्य सरकारला दंडाची रक्कम भरण्यासाठी दोन आठवडयांची मुदत दिली आहे.

एनजीटीने सतलज आणि व्यास नदीत फैलावली जाणारी अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त करत चौकशीसाठी समितीची स्थापना केली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर लवादाने पंजाब सरकारला दोषी ठरवत दंड देखील ठोठावला आहे.
दिल्लीत वाढत्या प्रदूषणासाठी पंजाबमध्ये पऱहाळी जाळणे हेच मुख्य कारण असल्याचे मानले जाते.

-Ads-

पऱहाळी व्यवस्थापनासाठी यंत्रे उपलब्ध करण्यास केंद्र अपयशी ठरल्याचा आरोप करत केजरीवालांनी केला आहे. यातून सर्वमान्य तोडगा निघण्याची गरज आहे. दिल्लीतील प्रदूषण यंदा धोकादायक पातळीवर पोहोचले आहे, असे लवादाने म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)