कौटुंबिक न्यायालयाच्या कामकाजात स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे

नगर – “कौटुंबिक न्यायालयामध्ये कौटुंबिक खटल्यांची वाढ होत आहे. दाखल झालेले खटले सामुपचाराने मिटावे, अशी भुमिका कौटूंबिक न्यायालयाची असते. विभक्त होणारे कुटूंब पुन्हा एकत्र यावे, यासाठी पती-पत्नींचे समुपदेशनही करत असतो. अशा परिस्थितीत विविध सामाजिक संस्थांनी या कामात सहभाग घेऊन समुपदेशन, मार्गदर्शन व पिडित महिलांना आधार दिला तर न्यायालयाचे कामकाज अधिक सुलभ होईल. कौटुुंबिक न्यायालयाच्या कामकाजात स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मोठा आहे,’ असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र पांडे यांनी केले.

शहरातील न्यायालयाच्या आवारातील कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणांमध्ये स्वयंसेवी संस्थांची मदत व्हावी, यासाठी शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या बैठक झाली. नगरमध्ये प्रथमच हा उपक्रम राबविण्यात आला. न्यायाधीश रवींद्र पांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक सुषमा बिडवे, न्यायाधारच्या ऍड. निर्मला चौधरी, दिलासा सेलच्या कल्पना चव्हाण, महिला बालकल्याण विभागाचे अधिकारी रवींद्र काकळीज, विशाखा वाहिनीच्या प्रतिभा बेलेकर, शिवाजी चव्हाण, स्नेहालय चॉईल्ड लाईनचे अनिल गावडे, ऍड. प्राची सोनवणे, ऍड. पल्लवी पाटील, ऍड.अर्चना सेलोत, ऍड. निलिमा भांगे आदी उपस्थित होते. सुषमा बिडवे यांनी प्रास्ताविक केले.कौटुंबिक न्यायालयाचे सहायक निरीक्षक संजीवनी कुलकर्णी, संदीप चोथे, उज्वला निर्माल आदी उपस्थित होते. कृष्णा आखमोडे यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)