जुनी पेन्शनसाठी लढा उभारणार : आमदार थोरात

नगर – नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या संगमनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे लक्ष वेधले. थोरात आणि डॉ. तांबे यांची भेट घेऊन पेन्शन मिळत नसल्याने कुटुंबियांच्या होत असलेल्या व्यथा मांडल्या. राज्य सरकारकडे जुनी पेन्शनसाठी पाठपुरावा, अशी मागणी निवेदन देत केली. आमदार थोरात यांनी पेन्शनसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.

ऑक्‍टोबर 2005ला सरकारने आदेश काढून नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय-निमशासकीय सेवेत रुजू होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी पेन्शन बंद केली. अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना सुरू केली. या पेन्शन योजनेत अनेक प्रकारच्या त्रुटी असून सुमारे 13 वर्षे होऊनही या योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी होऊ शकली नाही, याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. या योजनेत निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेप्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन मिळत नाही, ग्रॅच्युअटी मिळत नाही, मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कुठलाही लाभ मिळत नाही. यामुळे 1 नोव्हेंबर 2005 च्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. जुनी पेन्शन हक्क संघटनेने यासाठी धरणे आंदोलन, मुंडन मोर्चा, पेन्शन दिंडी, घंटानाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले आहे.

सरकारने सर्व कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन यातत्वाप्रमाणे हक्काची जुनी पेन्शन द्यावी, अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे निवेदन देत केली. थोरात व तांबे यांनी जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडे सर्व प्रयत्न करू, असे आश्‍वासन दिले.

संघटनेचे जिल्हा उच्चाधिकार नेते शिवाजी आव्हाड, राज्यनेते बाबुराव कदम, तालुका अध्यक्ष नीलेश हारदे, कोषाध्यक्ष विकास खेबडे, सरचिटणीस अशोक मधे, कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे, उपाध्यक्ष अशोक साळवे, खंडू कोळपे, अशोक शिंदे, संभाजी साकुरे, गणेश गाडेकर, महिला प्रतिनिधी मंगल खेमनर आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)