नगरकर  बोलू लागले… रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव 

 

जूना बोल्हेगाव रस्त्यावर पथदिव्यांचा अभाव 

 

बालिकाश्रम रस्ता परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य वेळेवर होतो. रस्तेदेखील याभागामध्ये सुस्थितीत आहेत. मात्र या भागामध्ये जूना बोल्हेगाव रस्ता आहे. या रस्त्यावर मात्र पथदिव्यांचा अभाव दिसून येतो, हा रस्ता दुुर्लक्षित राहिल्यामुळे येथे पथदिवे नाहीत. पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या रस्त्याने येणे-जाणे कठिण होते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या रस्त्यावरून सापांचे फिरणे वाढलेले दिसून येते.

– योगिता नाळे, बालिकाश्रम रोड 


पाणी वेळेवर सोडावे 

एमआयडीसी, परिसरामध्ये पाणी अवेळी सोडण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शहरामध्ये येण्यासाठी रिक्षासाठी अधिक खर्च सहन करावा लागतो. कॉलेजसाठी येण्या-जाण्यासाठी अधिक खर्च सहन करावा लागत आहे. बससेवा सुरू करण्याची गरज आहे. बोल्हेगाव फाटा परिसरात कायम सांडपाणी असते, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. यावर उपाय म्हणून या भागात ड्रेनेजची सुविधा करण्यात यावी.

– विनोद सुर्यवंशी, बोल्हेगाव 


पाण्याची अनियमितता टाळावी 

अनेक ठिकाणी रस्ते विविध कारणांसाठी खोदून ठेवले आहेत, मात्र त्यावर डागडूजी केली नाही. शिवाजीनगर परिसरातील रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत. त्याचबरोबर पाणी पुरवठा वेळेवर होत नाही. मात्र कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या वेळेवर येत नाहीत.

– आकाश आंदे, शिवाजीनगर 

 


पाणीपुरवठ्यामध्ये सातत्य नाही 

परिसरामध्ये पथदिव्यांचा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे संध्याकाळी महिलांसाठी हा रस्ता धोक्‍याचा बनून जातो, पाणी पुरवठ्यामध्ये अधून-मधून सातत्य बिघडते, त्याचबरोबर कचराकुंडीतील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे अनेकदा कचरा रस्त्यावर विखुरला जातो. तसेच नागरिकदेखील उघड्या नाल्यांमध्ये कचरा टाकून देतात त्यामुळे सांडपाणी अनेकदा रस्त्यावरून वाहते.

– पंकज नाईकवाडे, एमआयडीसी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)