संस्थानचा पैसा खर्च करण्याचा अधिकार हावरेंना कोणी दिला

file photo

कैलास कोते यांचा सवाल; हावरेंनी स्वतच्या व्यवसायातून खर्च करावा

शिर्डी – सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानचे भगवीकरण करण्याचा प्रयत्न संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे करीत आहेत. संघ परिवारातील वनवासी कल्याण कार्यकर्ता शिबीरासाठी लाखों रुपयांचा खर्च संस्थानच्या पैशातून करण्याचा अधिकार हावरेंना कोणी दिला आहे, असा सवाल माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी केला. हावरेंना संघाचा व भाजपचा विस्तार करायचा असेल तर त्यांनी साईंच्या झोळीत हात न घालता स्वत: च्या हावरे बिल्डर्सच्या माध्यमातून खुशाल खर्च करावा असे कोते म्हणाले.

-Ads-

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिपत्याखालील अखिल भारतीय वनवासी कल्याण कार्यकर्ता शिबीराचे आयोजन शिर्डीत करण्यात आले होते. या शिबीराचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले. या शिबीरासाठी साईसंस्थानच्या तिजोरीवर डल्ला मारत अध्यक्ष सुरेश हावरे व विश्‍वस्तांनी साठ ते सत्तर लाख रुपयांची उधळपट्टी केली असल्याचा आरोप कोते यांनी केला आहे. दिड लाख स्केअर फुट मंडपासह भोजन, निवास व दर्शन व्यवस्था याच पैशातून करण्यात आली.साईसंस्थान ही काही हावरेंची जहागिरी नाही.

सर्वसामान्य साईभक्तांच्या दानातून जमा होणाऱ्या पैशाचा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी संस्थान अध्यक्ष हावरे उपयोग करीत असल्याचे यातून उघड झाले आहे. साईबाबा समाधी शताब्दी वर्षात शिर्डीत विकासानंद कोणतेही काम न करता अध्यक्ष हावरे फक्‍त थापा मारण्याचे काम केले आहे. साईभक्तांच्या पैशाचा विनियोग शिर्डीच्या विकासासाठी न करता आजवर विदर्भातील स्वकीयांच्या संस्थान करोडो रुपयांचा निधी देवून साईभक्‍तांच्या दानावर डल्ला मारण्याचेच काम हावरे यांनी केला आहे.

याबाबत शिर्डी ग्रामस्थ साईसंस्थानच्या विश्‍वस्त व प्रशासनाला जाब विचारणार असुन भ्रष्टाचारी हावरे व विश्‍वस्तांच्या विरोधात तीव्र जनआंदोलन हाती घेण्याचा निर्णय शिर्डी ग्रामस्थांनी घेतला आहे. यावेळी साई निर्माणचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कोते, उपनगराध्यक्ष सुजीत गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, नितिन शेळके, बाबासाहेब कोते, ताराचंद कोते, उत्तम कोते, राजेंद्र कोते, अशोक कोते, गोपीनाथ गोंदकर, सचिन कोते, नितिन कोते आदी उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)