त्यांनी शहराशी गद्दारी केली – बबनराव पाचपुते

श्रीगोंदा – श्रीगोंदा नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी काहीजण आम्हाला सोडून गेले. हा पूर्व नियोजित प्लॅन होता. जे गेलेत त्यांच्यावर आमचा मोठा विश्वास होता. त्यांनी केवळ आमच्याशीच नव्हे तर, श्रीगोंदा शहरातील जनतेशी गद्दारी केल्याची घणाघाती टीका माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांचे नाव न घेता केली.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माऊली निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, ज्येष्ठ नेते तुकाराम दरेकर, सदाशिव पाचपुते, अल्लाउद्दीन काझी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. नगराध्यक्ष पोटेंवर टीका करताना पाचपुते म्हणाले, आम्हाला सोडून गेल्यांना आम्ही काय कमी केले हेच आम्हाला समजले नाही. मान-सन्मान दिला, पदे दिलीत, तरी आमच्याशी विश्वासघात केला. जे आमचे होऊ शकले नाही, ते जनतेचे कधी होणार. 2014 साली पोटे यांना प्रभाग 1 मध्ये मोठे मताधिक्‍य मिळाले, तेच मताधिक्‍य मला विधानसभेला का मिळाले नाही? जे गेले त्यांचा मी आभारी, त्यांनी मला चांगली टीम तयार करण्यासाठी वाट मोकळी करून दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण भाजपला पाठिंबा देत त्यांच्याशी आघाडी केल्याचे सांगताना प्रा. तुकाराम दरेकर यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर हल्ला चढविला. ते म्हणाले की, आपण भाजपला पाठिंबा दिला आहे. याबद्दल पक्षश्रेष्ठींनी खुलासा मागितला तर तालुक्‍यातील नेते कशी फसवणूक करतात याचे किस्से आपण सांगणार आहे. चार वर्षे झाली मला स्वपक्षातील नेत्यांकडून टार्गेट केले जात आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा जो निकाल लागला, त्याचीच पुनरावृत्ती नगरपरिषद निवडणुकीत होईल. पक्षाशी प्रामाणिक राहिले असते, तर मागील अडीच वर्षे नगरपालिकेची सत्ता कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे राहिली असती. आघाडीतील नेते पक्ष वाढीपेक्षा स्वतःची ताकद दाखविण्यासाठी पुन्हा पाडापाडीचे राजकारण करतील.

याप्रसंगी बाळासाहेब महाडिक, सभापती भैय्या लगड, एम. डी. शिंदे, सुनील वाळके, मिलिंद दरेकर, कुमार लोखंडे, गोपाळ मोटे, संतोष इथापे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)