#NZvIND : भारतीय महिलासंघाला न्यूझीलंडकडून ‘व्हाईटवॉश’

अटितटीच्या सामन्यात 2 धावांनी भारत पराभूत

हॅमिल्टन  -सोफी डिव्हाईनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर न्यूझीलंड महिला संघाने भारतीय महिला संघाचा 2 धावांनी पराभव करताना तिसऱ्या टी-20 सामन्यासह मालिका 3-0 अशा फरकाने जिंकताना भारतीय महिला संघाला “व्हाईटवॉश’ दिला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 161 धावांची मजल मारत भारतीय संघासमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना भारतीय महिला संघाला निर्धारित 20 षटकांत 4 बाद 159 धावांचीच मजल मारता आल्याने भारताने हा सामना 2 धावांनी गमावला.

यावेळी प्रत्युत्तरात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. नवोदित सलामीवीर प्रिया पुनियाकेवळ 1 धाव करुन परतल्यानंतर मालिकेत सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या स्मृती मंधना आणि जेमिमा रॉड्रीक्‍झने फटकेबाजी करत सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली. त्यामुळे 5.2 षटकांतच भारताने आपले अर्धशतक पुर्ण केले.

मात्र, फटकेबाजी करण्याच्या नादात जेमिमा 17 चेंडूत 21 धावा करुन परतली. तर, कर्णधार हरमनप्रीत कौर देखिल केवळ 2 धावा करुन परतल्यानंतर अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या मिताली राजला साथीत घेत स्मृतीने फतकेबाजी सुरुच ठेवली. मात्र, संघाच्या 123 धावा झाल्या असताना ती बाद झाली. स्मृतीने 62 चेंडूत 12 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 86 धावांची खेळी केली.

यानंतर मिताली राज आणि दिप्ती शर्माने फटकेबाजी करत संघाच्या विजयासाठी प्रयत्न केले. मात्र भारताला 159 धावांचीच मजल मारता आल्यने भारताला पराभुत व्हावे लागले. यावेळी मितालीने 20 चेंडूत नाबाद 24 तर दिप्तीने 16 चेंडूत नाबाद 21 धावांची खेळी केली. यावेळी न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनने 21 धावादेत 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची सलामीवीर सोफी डिव्हाईन आणि सुझी बेट्‌स यांनी पहिल्याच षटकापासून भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना फटकेबाजी करायला सुरूवात केली. दोघींनीही पहिल्या गड्यासाठी 5.3 षटकांत 46 धावांची भागीदारी केली.

यावेळी अरुंधती रेड्डीने ही जोडी फोडत भारताला पहिला बळी मिळवून दिला. त्यानंतर ठरावीक अंतराने त्यांच्या विकेट जात असल्याने त्यांच्या धावगतीला ब्रेक लागला होता. मात्र, एका बाजुने सलामीवीर सोफी डिव्हाईनने फतकेबाजी करत संघाला 150 धावांच्या वेशीवर पोहोचवले.

न्यूझीलंडच्या 140 धावा झाल्या असताना डिव्हाईन 52 चेंडूत 72 धावा करुन परतली. त्यानंतर कर्णधार ऍमी सॅथरवेटने 31 धावांची खेळी करत संघाला 161 धावांची मजल मारुन दिली. यावेळी भारताकडून दिप्ती शर्माने 28 धावा देत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक :

न्यूझीलंड महिला संघ 20 षटकांत 7 बाद 161 (सोफी डिव्हाईन 72, ऍमी सॅथरवेट 31, सुझी बेट्‌स 24. दिप्ती शर्मा 28-2, मानसी जोशी 27-1) विजयी विरुद्ध भारतीय महिला संघ 20 षटकांत 4 बाद 159 (स्मृती मंधना 86, मिताली राज नाबाद 24, दिप्ती शर्मा नाबाद 21, जेमिमा रॉड्रीक्‍झ 21, सोफी डिव्हाईन 21-2).

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)