#CWC19 : दक्षिण आफ्रिकेचे न्यूझीलंडपुढे 242 धावांचे आव्हान

बर्मिंगहॅम – रसी व्हॅनडर दुसे याने केलेल्या शैलीदार अर्धशतकामुळेच दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडपुढे 242 धावांचे आव्हान ठेवता आले. दुसे याच्याबरोबरच हशीम अमला या वरिष्ठ खेळाडूनेही अर्धशतक टोलवित संघाच्या धावसंख्येत महत्त्वाचा वाटा उचलला. दक्षिण आफ्रिकेने 49 षटकात 6 बाद 241 धावा केल्या.

ओलसर मैदानामुळे सामन्यास उशीरा सुरूवात झाली. त्यामुळे हा सामना 49 षटकांचा ठेवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. ड्युप्लेसिस याने 4 चौकारांसह 23 धावा केल्या. अमला याने संयमपूर्ण खेळ करीत 55 धावा केल्या. मरक्रम याने 4 चौकारांसह 38 धावा केल्या. हवेतील ओलसरपणाचा फायदा न्यूझीलंडच्या गोलंदाजांना फारसा मिळाला नाही.

आव्हान राखण्यासाठी महत्त्वाची लढत असल्यामुळे आफ्रिकेच्या फलंदाजांनी धोका न पत्करता सोप्या चेडूंवरच फटकेबाजी करण्याचे धोरण स्वीकारले होते. मधल्या फळीत रसी व्हॅनडर दुसे व डेव्हिड मिलर यांनी काही प्रमाणात आक्रमक फटके मारले. मिलर याने दोन चौकार व एक षटकारासह 36 धावा केल्या. दुसे याने शेवटच्या पाच षटकांमध्ये धावांचा वेग वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याने 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 67 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने तीन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक-

दक्षिण आफ्रिका 49 षटकात 49 षटकात 6 बाद 241 (हशीम अमला 55, रसी व्हॅनडर दुसे नाबाद 67, डेव्हिड मिलर 36, लॉकी फर्ग्युसन 3-59)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)