#NZvSL : टाॅम लॅथमचे शतक, न्यूझीलंड भक्कम स्थितीत

दुसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंड 2 बाद 311

वेलिंगटन : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडच्या टाॅम लाथमने नाबाद 121 धावांची शतकी खेळी तर राॅस टेलरने नाबाद 50 शानदार खेळी करत संघाला पहिल्या डावात 29 धावांची आघाडी मिळवून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय न्यूझीलंडकडून जीत रावल 43 धावा, केन विलियम्सन 91 धावा केल्या. श्रीलंकेतर्फे लाहिरू कुमार आणि धनंजया डी सिल्वा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.

तत्पूर्वी न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा पहिला डाव 282 धावांवर आटोपला. पहिल्या डावात श्रीलंकेतर्फे एंजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक 83 धावा केल्या तर दिमूथ करूणारतनेने 79 आणि निरोशन डिकेवलाने 80 धावा केल्या. न्यूझीलंडतर्फे पहिल्या डावात टीम साउथीने सर्वाधिक सहा गडी बाद केले. तर नील वॅगनरने दोन व ट्रेंट बोल्ट आणि काॅलिन डी ग्रॅंडहोमने प्रत्येकी एक गडी बाद केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)