प. बंगालमध्ये भाजपा सत्तेवर येणार – योगी आदित्यनाथ

ममता बॅनर्जी लोकशाही विरोधी

कोलकाता -बंगालमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूलच्या अरेरावीचा केलेला प्रतिकार कौतुकास्पद आहे. कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळेच बंगालमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर येणार आहे, असे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

भाजप 16 राज्यांमध्ये सरकार चालवत असल्याचे तृणमूलने विसरू नये, असा इशारा योगींनी यावेळी दिला. प. बंगाल सरकार विरोधकांना आपले राजकीय काम करू देत नसल्याचा आरोप त्यानी केला. त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका करत ममता बॅनर्जींचे सरकार लोकशाहीविरोधी असून जनतेने त्यांच्या विरोधात लढावे, असे आवाहन केले आहे.

जनताविरोधी, लोकशाहीविरोधी, अराजकतेला बळ देणारे तसेच राष्ट्रीय सुरक्षेकडे डोळेझाक करणाऱ्या घटकांना संरक्षण देणारे सरकार भाजपमुळे भयभीत झाले आहे. याच कारणामुळे यापूर्वी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची रथयात्रा रोखली आणि आता मला रोखले जातेय. लोकशाहीत परस्परांमध्ये मतभेद असू शकतात, परंतु आवाज कसा दडपला जाऊ शकतो? निवडणूक लढविणाऱ्या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या केली जाते. तृणमूल सरकारने पश्चिम बंगालमध्ये धुडगूस घातल्याचा आरोप योगींनी केला आहे.

बंगाल देशाच्या बौद्धिक संपदेचे स्थळ राहिले आहे. बंगाल ही रामकृष्ण मिशन, स्वामी विवेकानंद आणि श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांची भूमी आहे. केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन बंगालला सन्मानित केल्याचे विधान योगींनी केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)