येस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रवनीत गिल

नवी दिल्ली – येस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) पदाची जबाबदारी रवनीत गिल सांभाळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रवनीत गिल यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. रवनीत गिल सध्या डॉएशे बॅंक इंडियाचे सीईओ आहेत. एक मार्चपर्यंत ते नवा पदभार सांभाळणार आहेत.

रवनीत गिल 1991 पासून डॉएशे बॅंकेत आहेत. त्यांना कॅपिटल मार्केट, ट्रेजरी, फायनन्स, फॉरेन एक्‍सचेंज, रिक्‍स मॅनेजमेंट आणि खासगी बॅंकिंगचा अनुभव आहे. दरम्यान, रवनीत गिल यांच्या नियुक्‍तीनंतर येस बॅंकेच्या शेअरमध्ये बरीच वाढ झाली आहे. येस बॅंकेत सध्या सीईओ पदावर राणा कपूर आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये आरबीआयने येस बॅंकेला निर्देश दिले होते की, सध्याचे सीईओ राणा कपूर यांच्या कार्यकाळ कमी करून 31 जानेवारी 2019 पर्यंत केला जाईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आरबीआयने येस बॅंकेच्या एनपीएचे विश्‍लेषण केले होते. त्यामध्ये येस बॅंकेच्या आकडेवारीत तफावत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आरबीआयने राणा कपूर यांचा कार्यकाळ कमी करण्याचे निर्देश
दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)