यशवंत सिन्हा दिल्लीतून निवडणूक लढणार?

कॉंग्रेस आणि आप प्रत्येकी तीन जागा लढणार

नवी दिल्ली – एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस केवळ भाजपच्या विरोधासाठी एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांनी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांच्या वाटपाच्या वाटाघाटी पूर्ण केल्या आहेत. सातपैकी तीन जागा कॉंग्रेस तर तीन जागा आम आदमी पक्ष लढवणार आहे. उर्वरित एक जागा भाजपचे माजी नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक यशवंत सिन्हा यांच्यासाठी सोडण्यात येईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांच्याविरोधात महाआघाडी करण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी प्रयत्नशील आहेत. याच महाआघाडीचा एक भाग म्हणून दिल्लीत कॉंग्रेस आणि आपमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागांसाठी वाटाघाटी सुरू होत्या.

दिल्लीतील लोकसभेच्या सातपैकी तीनच जागा लढविण्याचा पक्षाचा निर्णय न पटल्यामुळे दिल्लीतील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनी गेल्या आठवड्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला. दिल्लीमध्ये 15 वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती; पण 2015 मधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दिल्ली विधानसभेतील एकूण 70 पैकी 67 जागांवर आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी झाले, तर 3 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.

कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीत खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर दिल्ली कॉंग्रेसची जबाबदारी माकन यांच्याकडे देण्यात आली. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पक्षाची जनमानसातील प्रतिमा बदलण्यासाठी मोठी मेहनत घेतली; पण आता लोकसभा निवडणुकीत आपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्यावर त्यांनी नाराजी व्यक्त करीत थेट प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला, असे समजते.

दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि ईशान्य दिल्ली या मतदारसंघातून आपचे उमेदवार उभे राहतील, तर पश्‍चिम दिल्ली, वायव्य दिल्ली आणि चांदणी चौक या मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार उभे राहतील.

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आपशी युती करण्यास हिरवा कंदील दाखविला. अरविंद केजरीवाल यांच्याकडून पराभूत होऊनही त्यांनी कॉंग्रेसच्या अस्तित्त्वासाठी भाजपला पराभूत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पराभव विसरून त्यांनी जागावाटपाला संमती दिली. आता त्यांचीच कॉंग्रेसच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)