#CWC19 : तर इंग्लंडच्या रस्त्यांवर शर्ट काढून फिरेल – कोहली

लंडन – भारताने विश्‍वचषक जिंकल्यास इंग्लंडच्या रस्त्यांवर मी शर्ट काढून फिरेन असे वक्तव्य विराटने मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात केले होते. याच वक्तव्यावरुन एका चाहत्याने भारत विश्वचषक जिंकल्यानंतर 15 जुलैला वृत्तपत्रांचा मथळा काय असेल याचे एक पोस्टरच तयार केले होते. या चाहत्याचा फोटो आता व्हायरल होताना दिसत आहे.

2018 साली एप्रिल महिन्यामध्ये कोलकत्यात प्रसिद्ध क्रीडा पत्रकार बोरिया मुझुमदार यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि विराट कोहली उपस्थित होते. यावेळी गांगुलीने भारत पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकल्यास विराट माझ्याप्रमाणेच शर्ट काढून तेथील रस्त्यांवर आनंद साजरा करेल असे मजेशीर वक्तव्य केले होते.

भारत विश्वचषक जिंकल्यावर विराट तुझ्यासारख लॉर्डसच्या गॅलरीमध्ये शर्ट काढून आनंद साजरा करेल का? असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला होता. “तो ऑक्‍सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल. आपण सर्वांनी कॅमेरा घेऊन तयार राहिल पाहिजे कोहलीला सिक्‍स पॅक्‍स ऍब्स आहेत. जर त्याने शर्ट काढून आनंद साजरा केला तर मला विशेष वाटणार नाही,’ अस उत्तर गांगुलीने दिले होते.

सौरभच्या या उत्तरानंतर कोहलीने हसत आपण खरच असे करु शकतो असे म्हटले होते. मात्र यावेळी माझ्याबरोबर हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह सुद्धा असेल असेही तो मजेत म्हणाला होता. मी एकटाच असा आनंद साजरा करणार नाही. मला खात्री आहे हार्दिक माझ्यासारखाच वागेल. 120 टक्के सांगतो मी. बुमराह पण शर्ट काढून नाचेल कारण त्यालाही सिक्‍स पॅक्‍स आहेत. याशिवाय इतरही काहीजण नक्कीच अशाप्रकारे आनंद साजरा करतील,’ असेही कोहली म्हणाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)