मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर हवा : व्यंकय्या नायडू

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला जागरणजोशचा पुरस्कार

नवी दिल्ली -भारतीय परंपरा, संस्कृती आणि इतिहास अतिशय समृद्ध आहे. नव्या पिढीला त्याविषयी जागृत करणे हे आपले दायित्व आहे. केवळ गुणांवर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शिक्षण संस्थांनी काम केले पाहिजे. त्यासाठी मूल्याधिष्ठित शिक्षण अभ्यासक्रमात समाविष्ट असायला हवे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.

जागरणजोश संस्थेतर्फे देण्यात येणारा टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन वेस्ट इंडिया ऍवॉर्ड पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय बी. चोरडिया यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला जागरण प्रकाशनचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक महेंद्र मोहन गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गुप्ता व भारत गुप्ता उपस्थित होते. पश्चिम भारतातील व्यवस्थापन महाविद्यालयांच्या क्रमवारीतील पहिल्या चारमध्ये सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने स्थान पटकावले होते. डॉ. चोरडिया म्हणाले, सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत शैक्षणिक कौशल्याच्या माध्यमातून कृती आणि विचारांतून स्वातंत्र्याची भावना रुजवली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)