शहरीकरणावर आगामी काळात भर : अमिताभ कांत

दावोस – भारतीय अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी आगामी काळात शहरीकरणावर भर देण्याची गरज निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी केले. अनेक क्षेत्रांमध्ये सातत्यपूर्ण होत असणाऱ्या सुधारणा आणि नवीन तयार करण्यात येणाऱ्या योजना यांचा फायदा आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यास उपयोगी पडणार असल्याचे मत जागतिक आर्थिक मंचच्या कार्यक्रमात कांत यांनी नोंदवले.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून भारताचा आर्थिक विकासदर येत्या काळात 7.5 राहणार असल्याचा अंदाज मांडण्यात आला आहे. म्हणजे भारत विकासात मोठी झेप घेत असल्याचे मुद्दे नोंदवण्यात येत आहेत. यात सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे शहरीकरण होय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताची अर्थव्यवस्था येत्या काळात शहरीकरणाला चालना देणार असून त्यासाठी स्मार्ट सिटी या उपक्रमाला सरकार व खासगी क्षेत्र सक्रिय झाले आहे. 100 हून अधिक शहरात अत्यधुनिक यंत्रणा व अन्य सुविधा उभारण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)