उमा भारती राममंदिरावर लक्ष केंद्रित करण्याची शक्‍यता

लोकसभा निवडणूक लढविणार नाहीत

भोपाळ – केंद्रीय मंत्री उमा भारती या 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका लढणार नाहीत. ही घोषणा त्यांनी स्वत: भोपाळमध्ये केली आहे. पुढची साडेतीन वर्ष निवडणुका लढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उमा भारती म्हणाल्या की, गंगा आणि राममंदिरसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यासाठी पुढची साडेतीन वर्षे कोणत्याही निवडणुका लढणार नाही. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव सुषमा स्वराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते.

मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्वराज यांनी हा निर्णय जाहीर केला. तसेच आपल्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाबाबत स्वराज यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनाही माहिती दिली. आता उमा भारती यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे सांगितले. भाजपच्या दोन फायर ब्रॅंड नेत्या आता लोकसभेत असणार नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)