तूर्त सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरण नाही

प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली – काही सरकारी बॅंकेचे विलीनीकरण झाले आहे. त्याचबरोर काहीचे विलीनीकरण चालू आहे. मात्र, आणखी बॅंकाचे विलीनीकरण सरकारच्या विषयपत्रिकेवर नसल्याचे अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कामगार संघटना आणि बॅंकांच्या संघटना नाराज आहे. सध्या निवडणुकाचे वातावरण असल्यामुळे सरकार आता या मुद्द्यावर निवडणुका होईपर्यंत तरी काही करणार नसल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने बडोदा बॅंक, विजया बॅंक आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणाला परवानगी दिली आहे. त्या बॅंकाच्या विलीनीकरणाला आणखी काही दिवस लागणार आहेत. त्यामुळे सध्या तरी इतर बॅंकांच्या विलीनीकरणाचा विषय सरकार हाताळणार नाही. आता देशातील एकूण सरकारी बॅंकाची संख्या कमी होऊन 18 वर आली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच तीन बॅंकाचे विलीनीकरण झाल्यानंतर निर्माण होणारी नवी बॅंक भारतातील तिसऱ्या क्रमाकांची बॅंक होणार आहे. नव्या बॅंकेचा एकूण व्यवहार 14.82 लाख कोटी रुपयांचा असणार आहे. या बॅंकांनी परस्पराच्या शेअरची देवाणघेवाण करण्याचा व्यवहार अगोदरच पूर्ण केला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)