कॉंग्रेसकडून तेलंगणातील पराभवाचे आत्मपरीक्षण

File photo

हैदराबाद – तेलंगणातील विधानसभा निवडणुकांमधील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी कॉंग्रेस चर्चासत्राचे आयोजन करणार आहे. या चर्चासत्रामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कशाप्रकारे व्यूहरचना करता येईल, याबाबत नेते आणि कार्यकर्त्यांची मते देखील घेतली जाणारा आहेत.

तेलंगणातील विधानसभा निवडणुकांचे 7 डिसेंबर रोजी निकाल लागले होते. जनतेने तेलंगणा राष्ट्र समितीला स्पष्ट बहुमत देत 119 पैकी 88 जागांवर विजयी केले होते. या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला केवळ 19 जागांवर समाधान मानावे लागले होते.

या चर्चासत्राबाबत सांगताना तेलंगणा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी म्हणाले की, लोकसभा निवडणुकांसाठीचा कृतिकार्यक्रम काय असावा याबाबत मार्गदर्शन करणे तसेच तेलंगणामध्ये नव्याने स्थापन झालेल्या 23 जिल्ह्यांमध्ये पक्षाचा जिल्हा अध्यक्ष नेमणे याबाबत निर्णय घेतली जातील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)