#CWC19 : असं झालं तर भारतीय संघ होऊ शकतो विश्वचषकाच्या बाहेर

File Pic

नवी दिल्ली – विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपल स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघामध्ये आता चढाओढ लागली आहे. त्यात यजमान इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या संघासाठी उपान्त्य फेरीच गणित कठीण होऊन बसले आहे. प्रत्येक संघाला उपान्त्य फेरी गाठण्यासाठी चांगली कामगिरी आणि इतर सामन्यांचा निकाल या शक्‍यतेवर अवलंबून रहावे लागणार आहे.

दरम्यान, विश्वचषक स्पर्धेच्या गुणतालिकेत इंग्लंडनंतरच्या पराभवानंतर भारतीय संघ 11 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्यफेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला एका विजयाची गरज आहे. भारताचे पुढील सामने बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याशी होणार आहेत. यापैकी मंगळवारी (2 जुलै) बांगलादेश तर शनिवारी (6 जुलै) श्रीलंकेशी सामना होणार आहे. यापैकी एक सामना भारताला जिंकावाच लागणार आहे अन्यथा भारताला उपांत्य फेरीतील प्रवेशासाठी इतर देशाच्या सामन्यांच्या निकालावर किंवा रनरेटवर अवलंबून रहावे लागेल.

विश्वचषक स्पर्धेत भारताचे अजून दोन सामने बाकी आहे. भारत जर बांगलादेश आणि श्रीलंकेविरुद्धचे असे दोन्ही सामने हरला तर भारताचे गुण 11 राहतील. यामुळे बांगलादेशचे गुण 9 होतील.श्रीलंका आज वेस्ट इंडिज विरोधात लढत आहे. दरम्यान त्यांचे वर्ल्ड कपमधलं आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. दुसरीकडे बुधवारी इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना रंगणार असून हा सामना जर इंग्लंड संघानं जिंकला तर 12 गुणांसह ते सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.

भारतानंतर बांगलादेशचा पुढचा सामना पाकिस्तान विरोधात होणार आहे. त्यामुळं या सामन्यात बांगलादेशनं विजय मिळवल्यास त्यांचे 11 गुण होतील. तर, पाकिस्ताननं हा सामना जिंकला तर त्यांचे 11 गुण होतील. त्यामुळं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि पाकिस्तान किंवा बांगलादेश हे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील तर यामुळं भारताचे आव्हान संपुष्टात येईल. पण क्रिकेटतज्ञाच्या मते भारतीय संघाची कामगिरी पाहता भारतीय संघ उर्वरित दोन्ही सामने जिंकेल असच चित्र आहे. दरम्यान, बांगलादेशविरूध्दच्या सामन्यात यासंबंधी चित्र स्पष्ट होईल.

#CWC19 : उपांत्य फेरी गाठण्यास ‘त्या’ चार संघांसमोरचे गणित

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)