विराट कोहलीचा असाही ‘एक’विक्रम

माऊंट मोंगानुई – भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धचा तिसरा सामना जिंकत 10 वर्षांनी न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकण्याची किमया साधली आहे. त्यामुळे कर्णधार म्हणूनही विराट कोहलीच्या नावावर विक्रम जमा झाला आहे. हा सामना कर्णधार म्हणून विराटचा 63 वा सामना होता.

63 सामन्यांत त्याने संघाला 47 विजय मिळवून दिले आहेत. अशी कामगिरी करणारा तो आशियातील पहिलाच कर्णधार ठरला आहे. तर 63 सामन्यांत कर्णधारपद भूषवताना सर्वाधिक 50 सामने जिंकण्याचा विक्रम संयुक्तपणे वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार क्‍लाईव्ह लॉईड आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्या नावे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विराट कोहलीने या विक्रमात सर व्हिव्हियन रिचर्डस आणि हॅंन्सी क्रोनी यांनाही मागे टाकले आहे. रिचर्डस आणि क्रोनी यांनी 63 सामन्यांत कर्णधारपद भूषवताना 46 विजयांची नोंद केले होती. तर मायकल क्‍लार्कने इतक्‍याच सामन्यात 41 विजयांची नोंद केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)