टाटा मोटर्सच्या जागतिक विक्रीत वाढ

नवी दिल्ली – टाटा मोटर्सने वाहन निर्मितीत मोठी झेप घेत आहे. जागतिक पातळीवर होलसेल, रिटेलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विक्रीच्या आकडेवारीत 13.9 टक्‍क्‍यांनी वाढ आहे. त्यात जॉग्वार लॅन्ड रोवर (जेएलआर) यांच्यातील 1,00.551 युनिट्‌सची विक्री डिसेंबरमध्ये झालेली आहे.

टाटाच्या 2017 च्या जागतिक विक्रीतील टप्प्याचा विचार केल्यास 1,16,677 युनिट्‌स इतकी विक्री झाल्याचे स्पष्टीकरण कंपनीने यावेळी दिले. टाटाच्या जागतिक विक्रीत होलसेल वाहन विक्री 59,898 युनिट डिसेंबरमध्ये झाली असली तरी वर्षभरातील विक्रीची तुलना केल्यास मागील महिन्यात यात घट झाल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर जेएलआरचा सेल 45,474 युनिट्‌स, लॅन्ड रोवरच्या विक्रीत 31,386 युनिट व जॉग्वारची 14,088 वाहनांची विक्री करण्यात आलेली आहे. आगामी काळात कंपनीकडून वाढता आलेख कायम उंचावत ठेवण्याचा निर्धार केला जाणार असल्याचे म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)