महाराष्ट्र बॅंकेचा स्वच्छ भारत मोहिमेत सहभाग

पुणे – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बॅंक ऑफ महाराष्ट्रने आपल्या देशभरातील महत्त्वाच्या शाखा आणि प्रशासकीय कार्यालयाद्वारे स्वच्छतेची मोहीम आयोजित केली. बॅंकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमन्त कुमार टम्टा यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केले होते.

राऊत म्हणाले, आमच्या बॅंकेचे राज्यामध्ये सर्वाधिक शाखांचे जाळे आहे आणि त्या माध्यमातून स्वच्छता आणि दीर्घकालीन आरोग्यदायी पर्यावरण संदर्भात जागरूकता आणणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही हाती घेत असलेल्या पुढाकाराने सामान्यजनांवर दीर्घ आणि चिरस्थायी ठसा उमटेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागरूकता आणण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरातील शाखांद्वारे विविध उपक्रम राबवण्यात आले. स्वच्छतेविषयी नागरिकांमध्ये संवेदनशीलता येण्याच्या जनजागृतीच्या दृष्टीने बॅंकेतर्फे ही कार्ये हाती घेतली गेली होती.पुण्यातील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला याबद्दल बॅंक ऑफ महाराष्ट्र तर्फे बॅंकेचे कार्यकारी संचालक हेमंत कुमार टम्टा यांनी बाबासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)