नऊ दिवसांपासून शेअरबाजारात विक्रीचा धुमाकूळ चालूच

मुंबई – आज सलग नवव्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट झाली. तेजीला लागलेले ग्रहण आज सुटण्याची शक्‍यता सकाळी निर्माण झाली होती. सकाळी निर्देशांक बऱ्यापैकी वाढले होते. मात्र नंतर आशियायी शेअर बाजारातून नकारात्मक संकेत आल्यानंतर भारतीय शेअर बाजारातही नफेखोरी वाढून दिवसाअखेर निर्देशांक कालच्या तूलनेत कमी बऱ्याच पातळीवर बंद झाले.

परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत असल्याचे वातावरण बाजारात आहे. आज माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्याना विक्रीचा फटका जास्त प्रमाणात बसला. उर्जा कंपन्यांच्या शेअरचीही नफ्यासाठी विक्री करण्यात आली. त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला नाही. या नकारात्मक वातावरणातही धातू, दूरसंचार, वाहन, रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्याचे शेअर वधारले. त्याचबरोर काही प्रमाणात छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉल कॅप 0.55 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मंगळवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 145 अंकांनी कमी होऊन 35352 अंकांवर बंद झाला तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 36 अंकांनी कमी होऊन 10604 अंकावर बंद झाला.

गेल्या काही दिवसापासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय भांडवल बागजारातून अंग काढून घेत असल्याचे वातावरण बाजारात निर्माण झाले आहे. काल या गुंतवणूकादारांनी तब्बल 1239 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 2336 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.

शेअर बाजारात गेल्या अनेक दिवसापासून ठाण मांडून बसलेल्या मंदीची कारणमिमांसा करतांना एम्के मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे संशोधन प्रमुख जोसेफ थॉमस म्हणाले की, आज मोठ्या आयटी कंपनयचे शेअर दुपारी मोठया प्रमाणात कोसळल्यानंतर निर्देशांक घसरत गेले. युरोपीयन समुदायातील अनेक देशांतील आर्थिक परिस्थिती बिघडत चालली असल्याचे संकेत मिळत आहेत.

त्याचबरोबर चीन आणि अमेरिकेचीही अवस्था फारशी चांगली नाही. त्यातच भारतात निवडणूकांचा हंगाम सुरू होणार असतांनाच भारत पाक तणाव वाढू लागल्यामुळे गुंतवणूकदार दिर्घ पल्ल्याची जोखीम घेण्यास तयार नसल्याचे वातावरण शेअर बाजारात असणे साहजीक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)