ते बीसीसीआयला विचारा : स्टिव्ह स्मिथ

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 1 वर्षाची बंदी घातली होती. पण त्यांना टी-20 लीग खेळण्यावर बंदी घातली नव्हती. त्यामुळे या दोघांनाही गेल्या हंगामात आयपीएल खेळायला मिळण्याची खात्री होती. परंतु बीसीसीआयने त्यांना खेळण्याची परवानगी नाकारली होती.

याबाबत स्मिथने आपले मौन सोडले आहे. त्याने गेला आयपीएल हंगाम मी का खेळलो नाही हे माझ्या पेक्षा बीसीसीआयला विचारा अशी खोचक प्रतिक्रिया त्याने सामन्यापुर्वी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)