समाजमाध्यम वापरात भारत मागे

नवी दिल्ली – जगभरात लोक प्रतिदिन सरासरी 2 तास 22 मिनिटांचा वेळ समाजमाध्यम आणि मेसेंजिगवर खर्च करतात. तर 2017 मध्ये हा कालावधी 2 तास 15 मिनिटांचा होता. सर्वाधिक वेळ समाजमाध्यमांचा वापर फिलीपाईन्सचे नागरिक करतात. तेथील लोक 4 तास 11 मिनिटांचा वेळ दररोज समाजमाध्यमांच्या वापरासाठी खर्च करतात. याप्रकरणी भारतीय 13 व्या स्थानावर आहेत. मात्र त्यात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

2017 मध्ये समाजमाध्यमांवर भारतीय वापरकर्ते दररोज सरासरी 2 तास 25 मिनिटांचा वेळ घालवायचे. 2018 मध्ये हा कालावधी 5 मिनिटांनी वाढून अडीच तास झाला. जपानचे लोक समाजमाध्यमांकरता केवळ 39 मिनिटांचा वेळ देतात. 2017 मध्ये ते याकरता 46 मिनिटांचा कालावधी द्यायचे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक जगातील सर्वाधिक पसंतीचे समाजमाध्यम व्यासपीठ ठरले आहे. रिसर्च फर्म ग्लोबल वेब इंडेक्‍सने समाजमाध्यम कलांनुसार एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरातील समाजमाध्यमांवर सक्रीय असणाऱ्य़ा एकूण सदस्यांपैकी 85 टक्के फेसबुकवर असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.

फेसबुकचा दैनंदिन वापर करणाऱ्य़ांची संख्या 79 टक्‍के आहे. याप्रकरणी युटयूब दुसऱ्या क्रमांकावर आहे. समाज माध्यमावरील एकूण वापरकर्त्यांमध्ये याच्या सदस्यांची संख्या 79 टक्‍के आहे, परंतु 86 टक्‍के लोक या माध्यमावरील
चित्रफिती पाहतात. ग्लोबल वेब इंडेक्‍सनुसार फेसबुक मेसेंजरचे 72 टक्‍के सदस्य असले तरीही यातील केवळ 55 टक्‍के लोकच याचा वापर करतात. या यादीत चौथ्या क्रमांकावर व्हॉट्‌सऍप असून याचे 66 टक्के सदस्य आहेत. 63 टक्‍के सदस्यांसह इन्स्टाग्राम 5 व्या क्रमांकावर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)