स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील बंदी संपली

file photo..........

ब्रिस्बेन -दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मागील वर्षी झालेल्या कसोटी सामन्यात चेंडू छेडछाड प्रकरणी 12 महिन्यांची बंदी घालण्यात आलेले ऑस्ट्रेलिया माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावरील बंदी शुक्रवारी उठणार असून ते मे महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वचषकासाठी उपलब्ध असतील.

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून संयुक्त अरब अमिराती येथे सामने खेळत आहे. पाच सामन्यांची मालिका त्यांनी आपल्या नावे केली आहे. बंदी संपल्यामुळे वॉर्नर आणि स्मिथ यांचा ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात सामील होण्याचा मार्ग सुकर झाला असला तरी ते सध्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)