स्मार्टफोनची विक्री वाढत जाणार

नवी दिल्ली : 2019च्या वर्षात भारतीय बाजारात 30 कोटी 20 लाख फोन विक्री अपेक्षित असून त्यात सर्वाधिक वाटा स्मार्टफोनचा असणार आहे. स्मार्टफोन विक्रीत गतवर्षाच्या तुलनेत मोठी वाढ होईल आणि हि संख्या 14.9 कोटी असेल. यातही चिनी स्मार्टफोनना अधिक मागणी येणार आहे. त्यातुलनेत 9 कोटी 8 लाख फिचर फोन आणि 5 कोटी 50 लाख स्मार्टफिचर फोन विकले जातील.

नव्या वर्षात भारतीय बाजारात शाओमी, वन प्लस यांचे वर्चस्व असेल तसेच गुगल, नोकिया, आसुस, रियल मी फोनसाठी चांगली मागणी असेल. ऍपलच्या विक्रीत मात्र घट होण्याची शक्‍यता आहे. त्यात नवीन वर्षात 5 जी, फोल्डेबल फोनची तसेच गेमिंग फोनची क्रेझ असेल पण भारतात त्यांना लगोलग मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी आहे. गेमिंग मध्ये मिडरेंज फोन आणले जातील असाही अंदाज या अहवालात व्यक्त केला गेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टेक्‍नोलॉजीकल रिसर्च फर्म टेकआर्क ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालनुसार नव्या म्हणजे भारतात 2019 मध्ये फोन बाजारात मोठा बदल अपेक्षित आहे. 2015 ते 2017 या काळात ज्या ग्राहकांनी पहिला 4 जी स्मार्टफोन घेतला ते नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करतील.

भारताच्या विविध भागात फोन खरेदी करण्याची मानसिकता वेगवेगळी आहे. दक्षिण आणि पश्‍चिम भागात ग्राहक दरवर्षी फोन बदलतात असे दिसते तर पूर्वोत्तर राज्यात 4 ते 5 वर्षे फोन वापरून बदलला जातो. उत्तर भारत दोन्हीच्या मध्ये आहे. म्हणजे येथे 1 वर्षापासून 5 वर्षे फोन वापरला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)