शेअर बाजारात पडझड चालूच

वाहन कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री

मुंबई – जागतिक शेअरबाजारात आज तेजीचे वातावरण होते. मात्र, भारतीय शेअरबाजारात विक्रीचे वारे कायम होते. निर्देशांक अगोदरच जरा उच्च पातळीवर आहेत. त्यातच काही कंपन्यांनी फारसे चमकदार ताळेबंद जाहीर केलेले नाहीत. त्याचबरोबर निवडणुकाचा परिणाम आता जाणवू लागला आहे. शिवाय या आठवड्यात महागाईची आकडेवारी जाहीर होणार असल्यामुळे गुंतवणूकदार सावध असल्याचे वातावरण आहे. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून शेअरबाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत.

मोटार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी विक्रीची एकत्रित आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार विक्रीत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे आज झालेल्या विक्रीचा जास्त फटका वाहन कंपन्यांना बसला. त्यातच टाटा मोटर्सला मोठा तोटा झाल्यामुळे त्याचा परिणाम वाहन कंपन्यांवर होत आहे.

सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 151 अंकांनी म्हणजे 0.41 टक्‍क्‍यानी कमी होऊन 36395 अंकांवर बंद झाला. गेल्या दोन कामकाजाच्या दिवसात हा निर्देशांक तब्बल 429 अंकांनी कमी झाला आहे. त्याचबरोबर सोमवारी राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 54 अंकांनी कमी होऊन 11 हजारांच्या खाली म्हणजे 10888 अंकांवर बंद झाला. आगामी काळातही अस्थिर वातावरण राहणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)