अदानी पोर्टकडून अमेरिकेतून 50 रेल्वे इंजिनची आयात

नवी दिल्ली – अदानी पोर्ट आणि विशेष आर्थिक क्षेत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार अदानी पोर्टने अमेरिकेत निर्मिती करण्यात आलेल्या 50 रेल्वे इंजिनांची आयात करून ती भारतीय रेल्वेत भरती करून दिली आहेत. सर्व रेल्वे इंजिनांची निर्मिती ही जीई इलेक्‍ट्रोमोटिव्ह व्हिजनच्या साहाय्याने तयार करण्यात आली असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. सदर इंजिने आयात करण्यासाठी मुद्रा पोर्टचा उपयोग करण्यात आला आहे.

अदानी पोर्ट आणि विशेष आर्थिक झोन लिमिटेड (एपीएसइझेड) यांच्यामार्फत यशस्वीरित्या 50 रेल्वे इंजिनांची वाहतूक करण्यात आली आहे. या अत्याधुनिक पद्धतीच्या रेल्वे इंजिनांचा भविष्यात भारतीय रेल्वेला सर्वांत जास्त फायदा होणार असल्याचा विश्‍वास यावेळी व्यक्‍त करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेल्वे इंजिनांची आयात केल्यानंतर ती मुंद्रा बंदरावर उतरण्यात आल्यानंतर त्यांना क्रेन जोडून मोठ्या ट्रकचा वापर करून त्याची वाहतूक करण्यात आली. येणाऱ्या काळात हेलिकॉप्टरची आयात करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)