रेल्वेत खासगी सहभाग वाढणार

नवी दिल्ली – कंपन्यांना वस्तू आणि सेवांच्या बदल्यात रेल्वेगाड्यांमध्ये जाहिरातीची संधी दिली जाणार आहे. यासंबंधी रेल्वेच्या सर्व महाव्यवस्थापकांना 27 डिसेंबर रोजी निर्देश देण्यात आला आहे. दररोज लाखो लोक रेल्वेमधून प्रवास करतात. रेल्वेच्या माध्यमातून या ब्रॅंड्‌सना मोठी प्रसिद्धी मिळू शकते असा दावा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

एका कोचिंग डेपो ऑफिसरला (सीडीओ) अशा प्रकारचा प्रस्ताव मिळाल्यास तो रेल्वेच्या संकेतस्थळावर 21 दिवसांसाठी प्रदर्शित केला जाईल. यातून अशा प्रकारच्या उत्पादनांसाठी स्वारस्य बाळगणाऱ्या अन्य संबंधितांनादेखील समान संधी मिळावी असा यामागचा हेतू आहे. प्रतीक्षा कालावधी संपुष्टात आल्यावर सीडीओ एका कंपनीची निवड करू शकतो.

प्रारंभीच्या काळात अशा प्रकारच्या जाहिरातीसाठी सीडीओ प्रत्येक डेपोत दोन रेल्वेसाठी तीन महिन्यांकरता अनुमती देऊ शकतो, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रारंभिक काळात सेवेऐवजी वस्तू स्वीकारण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत.

कंपन्या रकमेच्या जागी स्वतःचे उत्पादन आम्हाला पुरवू शकतात. आम्ही त्यांना रेल्वेमध्ये जाहिरातींची संधी देणार आहोत, असे अधिकाऱ्याने सांगितले. प्रत्येक डब्यातील स्वच्छतागृहात किंवा दरवाजानजीक कमाल 4 उत्पादनांचे फलक लावले जाऊ शकतात. नियमानुसार जाहिरातीचा आकार 6 इंच गुणिले 6 इंच असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)