पासवानपुत्राकडून राहुल गांधींची स्तुती

नवी दिल्ली – भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएत प्रचंड अस्वस्थता आहे. एकीकडे परममित्र शिवसेना नाराज आहे. यापूर्वी टीडीपी, त्यानंतर कुशवाह बाहेर पडले आता रामविलास पासवान यांचा पक्षही नाराज आहे. पासवान यांचा एलपीजीही एनडीएतून बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पासवान यांचे पुत्र चिराग यांनी तर कधी नव्हे इतके राहुल गांधीचे कौतुक केले. राहुल गांधी अच्छे कर रहे है असे सांगत कॉंग्रेसने आणखी मेहनत घेतली तर त्यांना फायदा होऊ शकतो असे सांगत भाजपला एकप्रकारे इशारा दिला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसला मिळालेल्या यशाचे पासवान यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. ते म्हणाले की, टीडीपी आणि कुशवाह रालोआतून बाहेर पडल्याने एनडीएची ताकद कमी झाली आहे. कॉंग्रेसचा तीन राज्यात विजय झाल्याने राहुल यांचा उत्साह वाढला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका दूरचित्रवाणीशी बोलताना ते म्हणाले, कॉंग्रेसनेही खूप आनंदी होता कामा नये. कारण राजस्थान आणि मध्य प्रदेशात या पक्षाला मिळालेला विजय एकतर्फी नाही. कॉंग्रेस काठावर पास झाली आहे. त्यामुळे त्यांना अधिक मेहनत करावी लागणार आहे. दोन पक्ष एनडीएतून बाहेर पडल्याने आमची ताकद कमी झाली आहे. यासाठी भाजपने मित्रपक्षांना सन्मानाने वागविले पाहिजे. आज जे एनडीएत आहेत त्यांना सांभाळले पाहिजे.

भाजपला इशारा देताना ते म्हणाले, की राममंदिर हा एनडीएचा नव्हे तर भाजपचा अजेंडा आहे. त्यामुळे त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्‍न आहे. दरम्यान, बिहारमधील जागा वाटपावरूनही रामविलास पासवान यांचा पक्ष भाजपवर नाराज आहे.
त्यामुळेच की काय भाजपवर दबाव आणण्यासाठी त्यांनी राहुल गांधीचे कौतुक करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे ते आगामी काळात काय भूमिका घेतात, याकडे बिहार व उत्तर प्रदेशातील जनतेचे लक्ष लागले आहे.

“पाच राज्यांत भाजपाच्या हाती काहीही लागले नाही. याच काळात रालोआचा महत्त्वाचा घटक असलेले तेलगु देसम आणि कुशवाह रालोआतून बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे भाजपाने आगामी काळात रालोआतील घटक पक्षांना सन्मानाने वागविण्याची गरज आहे. असे असले तरी कॉंग्रेसने फार आनंदी होण्याची गरज नाही, कारण पाच राज्यांत झालेल्या निवडणुकात भाजपाला मिळालेल्या मतात फार मोठी घट झालेली नाही.
-चिराग पासवान, खासदार, लोकजनशक्ती


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)