ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पराभव विचार करायला लावणारा – द्रविड

नवी दिल्ली – विश्‍वचषक स्पर्धेपूर्वीच्या अखेरच्या एकदिवसीय मालिकेतील पराभव भारतीय संघाच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल, असे मत भारतीय संघाचा महान फलंदाज राहुल द्रविडने व्यक्त केले. विश्‍वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघच जेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असेही तो यावेळी म्हणाला.

भारतीय संघ मालिकेत 2-0 अशा आघाडीवर होता, परंतु ऑस्ट्रेलियाने दमदार कमबॅक करताना पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-2 अशी जिंकली. कर्णधार विराट कोहलीवर घरच्या मैदानावर मालिका गमावण्याची नामुष्की प्रथमच ओढावली. 30 मे पासून विश्‍वचषक स्पर्धेला सुरुवात होत आहे.

विश्‍वचषक स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये जायचे आहे आणि विश्‍वचषक घेऊन यायचा आहे, असे मत व्यक्त केले जात होते. असे झाले तर चांगलेच होईल. पण, या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामुळे आपल्याला विश्‍वचषक स्पर्धेमध्ये आणखी चांगला खेळ करावा लागेल, याची जाण करून दिली असेही त्याने यावेळी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)